Krushisahayak

Digital Crop Survey App पीक विम्यातून दिली जाणारी भरपाई तसेच आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत यांसाठी अचूक माहिती मिळावी म्हणून केंद्र, राज्य सरकारने डिजिटल क्रॉप सर्व्हे हे अॅप पीक पाहणीसाठी तयार केले असून,

राज्यातील ११४ गावांमध्ये याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याची अचूक माहिती प्राप्त झाली असून पुढील वर्षापासून राज्यात सर्व ठिकाणीयाच अँपमधून नोंदणी केली जाईल.

११४ गावांमध्ये अंमलबजावणी सुरू

केंद्र सरकारने तयार केलेल्या डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपची राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी दोन गावे व देवळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये अशा एकूण ११४ गावांमध्ये प्रायोगिक स्तरावरील अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. यासोबतच राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी अॅपमधून नेहमीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

Digital Crop Survey App

डिजिटल क्रॉप सर्व्हे हे अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रासह १२ राज्यांत वापरण्यास सुरुवात Digital Crop Survey App

हे अॅप महाराष्ट्रासह १२ राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली. राज्यात ११४ गावांत याचा वापर केला जात आहे. पुढील वर्षापासून राज्यभर वापर करून पीक पाहणी करण्यात येणार आहे.

Krushisahayak

डिजिटल क्रॉप सर्व्हे हे अॅप डाउनलोड करा.

५० मीटरच्या आतील फोटो बंधनकारक

पूर्वीच्या अॅपमध्ये गट क्रमांकाचा मध्यबिंदूपासून ज्या ठिकाणाहून फोटो काढर्ता, त्याचे अंतर गृहीत धरले जात होते. आता जास्त अंतरावरून फोटो काढता येणार नाही. पिकांचे १०० टक्के फोटो उपलब्ध व्हावेत, अशी अट आहे.

सततच्या पावसाची kyc झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे आज खात्यात येतील

3 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: