Land Rate Valuation जर का एखाद्या सरकारी प्रकल्पात रस्ता,महामार्ग,धरण किंवा एखाद्या गावाचा पुनर्वसन असेल . तर त्या प्रकल्पात त्या भागातील शेती जमिनीचा सरकारी बाजारभाव काय आहे हे माहिती असणे आवश्यक असतो.
Table of Contents
एखाद्या भागात शेतजमीचे खरेदी विक्री करणार असेल तर त्या भागातील सरकारी भावा माहिती जाणून घ्यावे आवश्यक गरजेचे असते. एखाद्या शहराच्या ठिकाणी एखादा गाळा विकत घेत असाल किंवा ऑफिस सुरू करणार असाल तर त्या भागातील शेतजमीचा सरकारी भाव माहिती असणं आवश्यक असते.

गावातील जमिनीचा सरकारी दर
- घरबसल्या पाचच मिनिटात महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणचे सरकारी भाव मोबाईलवर पाहू शकता.
- ज्या गावातून येतात त्या गावातील जमिनीचा सरकारी भाव किंवा दर कसा पाहायचा जाणून घेणार आहोत.
- सर्वात आंगोदार rgmaharashtra.gov.in यावर लॉगिन करा.
- त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.
- या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर बाजारमूल्य दर पत्रक नावाचा एक नवीन पेज ओपन होईल यावर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल .
- ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा असेल तर त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज ओपेन होईल समोर डावीकडे वर्ष निवडा आणि उजवीकडे भाषा निवडा.
- त्यानंतर सुरुवातीला जो जिल्हा निवडला तो ओपन होईल.

- त्या पुढे तालुका आणि गावाचं नाव टाका. गावाचे नाव निवडल्यावर खाली गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसून येतील.Land Rate Valuation
- सुरुवातीला असाईमेंट टाईप मध्ये जमिनीचा प्रकार दिसेल.
- त्यानुसार पुढे असाईमेंट रेंज आणि रेट यामध्ये जमिनीचा सरकारी भाव दिलेला असेल.
- सरकारी बाबाची किंमत दिली असेल ती जमिनीची प्रति हेक्टर नुसार किंमत दिलेली असते.
- असाईमेंट रेंज म्हणजे जमिनीचा प्रति हेक्टरी आकार कसा काढायचा ते आता बघू शकतो.
- शेतकरी असाल तर सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांच्या नावासमोर त्याच्या नावावर किती क्षेत्र आहे.
- त्या पुढे किती आकार आकारणी केला जातो त्याची माहिती असते.
- असाईमेंट रेंज काढण्यासाठी तत्यासाठी काही सूत्रे आहेत. तर त्यासाठी
- अससेससमेंट रेंज = आकार भगिले क्षेत्र
- या सूत्रणूसार तुम्ही अससेससमेंट रेंज काढू शकता.
- ह्या प्रकारानुसारजमीन किती रुपयांना किंवा जमिनीचा सरकारी बाजारभाव काय आहे हे पाहू शकता.

जुन्यातला जूना सातबार मोबाइल मधून करा डाउनलोड
शहरातील दर कसं पाहायचा?
- त्यासाठी पुन्हा एकदा बाजार मूल्य दर पत्रक या पेजवर या .
- स्क्रीनवर जिल्हा आणि तालुका निवडा पुढे गावाचे नाव आणि महानगर पालिका निवडा.
- पुढे सर्वे नंबर दिसेल या नंबर वर क्लिक केल्यावर त्या उपविभागात कोणकोणते सर्वे नंबर येतात त्यांचे नाव खाली दिलेली असतील. त्यासमोर उपविभागाचे नाव असेल. Land Rate Valuation
- त्या उपविभागाचे नाव आणि पुढे प्रति चौरस मीटर या एककानुसार जमिनीच्या दर दिलेला आहे.
- खुली जमीन असेल तर १४३०० रुपये प्रति चौरस मीटर निवासी सदनिकेसाठी 30500 रुपये प्रति चौरस मीटर ऑफिस साठी 35 हजार पाचशे रुपये प्रति चौरस मीटर आणि दुकानांसाठी 53 हजार रुपये प्रति चौरस मीटर असे जमिनीचे सरकारी भाव राहील.
- या पद्धतीने शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीचे सरकारी भाव नेमके काय आहे ते मोबाईलवर बघू शकता.

जमिनीचे भाव पाहण्यासाठी क्लिक करा
Land Rate Valuation सरकारी दर का माहिती असावेत?
- जमिनीचे शासकीय दर कमी आहेत ते वाढवण्यावर मर्यादा असतात सरकारी नियमानुसार हे ठरवले जातात त्यासाठी गेल्या वर्षभरातील व्यवहार पाहिले जातात.
- जमिनीचा जो शासकीय दर दिला जातो ती त्या जमिनीची कमीत कमी किंमत असते त्यापेक्षा कमी किमतीला व्यवहार झाला तर तो सरकार दरबारी अंडर व्हॅल्यूड म्हणजे ठराविक किमतीपेक्षा कमी किमतीत झालेला व्यवहार समजला जातो. Land Rate Valuation
4 Responses