Krushisahayak

Government Schemes for women श्रावण महिन्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘श्रावणमास लालपरीसोबत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना लालपरीतून देवदर्शनासाठी मंगळवेढा, कुर्डुवाडी, अकलूज व पंढरपूर आगारातून विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे.

बसमधून प्रवास करताना ७५ वर्षांवरील प्रत्येक प्रवाशाला १०० टक्के मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या प्रवाशांना व महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे. दरम्यान, देवदर्शन बस उपलब्ध करून देताना किमान ४० प्रवाशांचे बुकिंग होणे आवश्यक आहे.

Krushisahayak

मृत्यूनंतरचे जीवन, देहदान व अवयव दान

तसेच महिला बचत गटाने देखील बसची मागणी केल्यास त्यांनाही गावातूनच बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. कमी तिकीट दरात श्रावण महिन्यात भाविकांना वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शनाची सोय परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. जेवणाचा खर्च मात्र प्रवाशांनाच करावा लागणार आहे. हा उपक्रम श्रावण महिन्यापर्यंतच सुरु राहणार आहे. विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

मंगळवेढा आगारातून…

  • १२ ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ, येरमाळा व तुळजापूर दर्शनासाठी पूर्ण तिकीट ७७५ तर अर्धे तिकीट ३९० रुपयांचे मोजावे लागणार आहेत.
  • मंगळवेढा, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूर व माचणूर दर्शनासाठी पूर्ण तिकीट ४९५ तर अर्धे तिकीट २५० रुपये आकारले जाणार आहेत.
  • मंगळवेढा, शिंगणापूर, गोंदवले, म्हसवड, पंढरपूर दर्शनासाठी पूर्ण तिकीट ३७० तर अर्धे तिकीट १९० रुपये द्यावे लागणार आहेत.
  • दोन मुक्कामासह (ओझर व पाली येथे) मंगळवेढा ते अष्टविनायक दर्शनाकरिता पूर्ण तिकीट १६२० तर अर्धे तिकीट ८१५ रुपये असणार आहे.
Government Schemes for women

ऑनलाइन बूकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

अकलूज आगारातून…

  • अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर, गाणगापूर या प्रवासासाठी पूर्ण तिकीट ८०० रुपये तर अर्धे तिकीट ४०० रुपये असणार.
  • अकलूज, कोल्हापूर, कन्हेरीमठ आणि अकलूज, बार्शी, परळी वैजनाथ या प्रवासासाठी प्रवाशांना प्रत्येकी ८८० रुपये पूर्ण तिकीट तर अर्धे तिकीट ४४० रुपये असणार आहे.
  • अकलूज, म्हसवड, गोंदवले, औंध व गाणपूर या प्रवासासाठी पूर्ण तिकीट ६६० रुपये आणि अर्धे तिकीट ३३० रुपये असणार आहे.
Krushisahayak

येथे क्लिक करा.

कुर्डुवाडी आगारातून Government Schemes for women

१२ ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ दर्शन व पंढरपूर श्री विठ्ठल व शिंगणापूर महादेव दर्शनाची सोय लालपरीने उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, परळी वैजनाथ येथे जाऊन येण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला पूर्ण तिकीट ५२० रुपये तर अर्धे तिकीट २६० रुपये असणार आहे. तसेच पंढरपूर, शिंगणापूरसाठी पूर्ण तिकीट २४० रुपये तर अर्धे तिकीट १२० रुपये आकारले जाणार आहेत.

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d