Categorisation of farmers मित्रांनो महाडीबिटी शेती योजना असो पीएम किसान योजना असो की पीक वीमा असो सर्वत्र विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा शेतकरी वर्ग कोणता.
अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक की बहु भूधारक ? farmer categorization
मात्र आपल्याला याबद्दल माहिती नसल्याने आपण गोंधळून जातो. आपणास माहिती नसल्याने चुकीचा प्रवर्ग नोंदविला जातो म्हणून आज ही माहिती समजून घेऊयात.
Categorisation of farmers
देशात शेती ( Operational holdings ) तीन सामाजिक गटामध्ये वर्गीकृत आहे. उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर. Scheduled Castes, Scheduled Tribes and Others.

या वर्गातील शेतीचेही शासनाने २०१५ – १६ च्या ताज्या कृषी जनगणणेनुसार देशातील परिचालन ( provisional ) होल्डिंगचा राज्यवार सरासरी आकार निश्चित केला आहे. Categorisation of farmers मध्ये जमीन धारणा ( jamin dharna – land holdings) पाच प्रकारामध्ये विभागली आहे.
Marginal farmers अत्यल्प भूधारक शेतकरी marginal farmers land holding
अत्यल्प भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे १ हेक्टर अर्थात २.५ एकर पेक्षा कमी क्षेत्र आहे, अशे शेतकरी या गटात मोडतात. Below 1.00 hectare
Small farmers अल्प भूधारक शेतकरी
अल्प भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे १ हेक्टर पेक्षा जास्त मात्र २ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात २.५ एकर पासून ५ एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 1.00-2.00 hectare
Semi- Medium farmers अर्ध मध्यम भूधारक शेतकरी
अर्ध मध्यम भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर पेक्षा जास्त मात्र ४ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात ५ एकर पासून १० एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 2.00-4.00 hectare
Medium farmers मध्यम भूधारक शेतकरी
मध्यम भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे ४ हेक्टर पेक्षा जास्त मात्र १० हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात १० एकर पासून २५ एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 4.00-10.00 hectare
Large farmers बहु भूधारक शेतकरी
बहु भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे १० हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे अर्थात २५ एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 10.00 hectare and above
या पाच प्रकारातील तीन प्रकार मुख्यत्वे वापरले जातात ज्यात अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी, बहु भूधारक शेतकरी.

Categorisation of farmers
विविध कृषी पिकांचे उत्पादन/उत्पादकता सुधारण्यासाठी, सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बहुविध पीक, आंतरपीक आणि एकात्मिक शेती पद्धती इत्यादी पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देत आहे. IDFC ग्रामीण विकास नेटवर्कने तयार केलेल्या “भारतीय ग्रामीण विकास अहवाल 2012-13” मध्ये, असे आढळून आले आहे की लहान शेतजमीन विशेषत: श्रम-केंद्रित पिके किंवा पशुधन सांभाळण्यात अधिक कार्यक्षम आहेत, परंतु पुरेशी घरगुती उत्पन्न निर्मिती करण्यासाठी जमीनधारणा खूपच कमी आहे.
Categorisation of farmers अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकार उत्पादन-केंद्रित दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न-केंद्रित उपक्रमांकडे, चांगल्या आणि नवीन तांत्रिक उपायांवर लक्ष केंद्रित करून हस्तक्षेप करत आहे.

Low CIBIL Score Loan App 2023 सेफ आहे! अॅप उघडा, कर्ज घ्या !!
यामध्ये, या शेतकऱ्यांकरीता सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY), परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), मृदा आरोग्य कार्ड ( Soil health card ), नीम कोटेड युरिया, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान (NMSA) अंतर्गत पर्जन्य क्षेत्र विकास ( koradvahu kshetr vikas ), प्रधानमंत्री फसल विमा योजना ( PMFBY) यासारख्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
याचबरोबर राष्ट्रीय कृषी बाजार योजना (e-NAM), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय तेलबिया आणि तेलपाम (NMOOP), फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी मिशन (MIDH), राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY), नॅशनल मिशन ऑन अॅग्रिकल्चर एक्स्टेंशन अँड टेक्नॉलॉजी (NMAET) इ. योजना ही राबविल्या जात आहेत.
Crop Insurance Scheme 53 मंडळांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई
3 Responses