Headlines

onion supplier कांदा उत्पादकांना बसणार फटका, कांदा निर्यातीवर 40 टक्के कर !

onion supplier
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

onion supplier सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रणासाठी केंद्रानं मोठ पाऊल उचललं आहे. त्यानुसार, कांद्यावर ३१ डिसेंबरपर्यंत तात्काळ प्रभावानं ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलं आहे. यासाठी केंद्र सरकारच्या महसूल विभागाकडून शनिवारी अध्यादेश काढण्यात आला. (To improve domestic availability of onions GOI imposes 40 perc export duty on onions)

या वर्षी साठा केलेल्या 3.00 लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरसाठ्यातील onion supplier कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रीय  ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी 10.08.2023 रोजी नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाच्या (NCCF)  व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली आणि या कांद्याची विक्री करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती या देशपातळीवरील किमतींच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत अशी राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ज्या ठिकाणी मागील महिन्याच्या आणि वर्षाच्या तुलनेत किमतीत वाढ होण्याचे प्रमाण  खूपच अधिक  आहे त्या ठिकाणी ई-ऑक्शन च्या माध्यमातून कांद्याची विक्री करणे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून कांद्याची किरकोळ विक्री करण्याचे ठरवण्यात आले. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दर आणि उपलब्धतेच्या परिस्थितीनुसार त्याचे प्रमाण आणि विक्री करण्याची गती देखील ठरवली जाईल. बाजारांमधल्या विक्री व्यतिरिक्त, राज्यांना त्यांच्या ग्राहक सहकारी संस्था आणि महामंडळांच्या विक्री केंद्रांमधून कांद्याची विक्री करता यावी यासाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

चालू वर्षात, बफर साठ्यासाठी एकूण 3.00 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे, परिस्थितीनुसार गरज भासल्यास  हा साठा आणखी वाढवता येईल . onion supplier दोन केंद्रीय नोडल एजन्सी, म्हणून नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रत्येकी 1.50 लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी केला होता. साठवणुकीदरम्यान कांदा अधिक टिकवा यासाठी यावर्षी भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) च्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर कांद्याचे विकिरण हाती घेण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे 1,000 मेट्रिक टन कांद्यावर  विकिरण प्रक्रिया करण्यात आली आणि हा कांदा नियंत्रित तापमानात गोदामात साठवण्यात आला आहे .

Krushisahayak

कांदा उत्पादकांना बसणार फटका

कांद्याच्या दरामधील अस्थिरता रोखण्यासाठी केंद्र सरकार किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याचा बफर साठा ठेवत असते. दरवर्षी रब्बी कांदे खरेदी onion supplier करून बफर साठा निर्माण केला जातो आणि तो कांद्याची मागणी वाढण्याच्या काळात मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये पाठवला जातो. गेल्या चार वर्षांत कांद्याच्या बफर साठ्याच्या क्षमतेत तिपटीने वाढ झाली असून वर्ष 2020-21 मध्ये 1.00 लाख मेट्रिक टन एवढा साठा असलेला कांदा वर्ष 2023-24 मध्ये 3.00 लाख मेट्रिक टन एवढा झालेला आहे. कांद्याच्या या बफर साठ्याने  ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तूर डाळीच्या अखिल भारतीय घाऊक दरात 2.4% घट onion supplier

देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणखी एक ठोस उपाय म्हणून केंद्र सरकारने आज ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर आणि उडीद डाळीची आयात 31 मार्च 2023 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय अधिसूचित केला.

या निर्णयामुळे येत्या आर्थिक वर्षात (2022-23) तूर आणि उडीद आयात धोरणाबाबतच्या अटकळींना पूर्णविराम मिळाला  आहे आणि यातून  स्थिर धोरणाचे संकेतही दिले आहेत  ज्याचा सर्व संबंधितांना लाभ  होईल. या उपायामुळे देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी या डाळींची आयात सुनिश्चित होईल. या डाळींच्या पुरेशा उपलब्धतेमुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

Krushisahayak

Goa Land Records :बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

सुरळीत आणि निर्बाध आयात सुनिश्चित करण्यासाठी सरकारने 15 मे 2021 पासून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यास परवानगी दिली होती. तूर आणि उडीद डाळीच्या  आयाती संदर्भातील मुक्त श्रेणीची  व्यवस्था त्यानंतर 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. या धोरणात्मक उपायांना सुविधा उपायांद्वारे पाठबळ पुरवले जात असून   संबंधित विभाग/संस्थेद्वारे   अंमलबजावणीवर देखरेख केली  जात आहे. onion supplier

ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, 28.03.2022 रोजी नोंदवलेल्या तूर डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 102.99 रुपये प्रति किलोग्राम आहे, जी 28.03.2021 रोजी  105.46 प्रति किलोग्रॅम होती , म्हणजेच  2.4% घसरण झाली आहे.  28.03.2022 रोजी नोंद झालेली उडीद  डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत  104.3 रुपये प्रति किलोग्रॅम , जी  28.03.2021 रोजीच्या 108.22 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तुलनेत  3.62% कमी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!