Business Ideas बऱ्याचदा नोकरी ही अनेकांची पसंती नसते. आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा यासाठी ते धडपडत असतात. पण हातात भांडवल कमी असल्याने नेमके काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. अशांसाठी कमी भांडवलात सुरु होणारे असे काही व्यवसाय आहेत जे तुम्हाला उत्तम व्यावसायिक बनवू शकतील.
Table of Contents
नोकरी म्हंटले की तेच ठरलेले आठ ते दहा तासांचे काम, प्रवास, धावपळ त्यात कामाचा ताण अशा बऱ्याच अडचणी असतात. पोटासाठी असंख्य लोक नोकरी करत असले तरी काहीजण असे असतात ज्यांना नोकरी करणे आवडत नाही. मेहनत घ्यायची तयारी असते, पण ती स्वतःसाठी.. स्वतःच्या व्यवसायासाठी. छोटा का होईना पण आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे त्यांना वाटत असते. पण अडचण असते ती भांडवलाची. आपल्या मनातला व्यवसाय साकार करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांचे हात बांधले जातात. पण असेही काही व्यवसाय आहेत हे आपण कमी भांडवलात उभे करून त्यात प्रगती करू शकतो. तेव्हा पाहूया हे व्यवसाय नेमके कोणते आहेत..

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आता सर्वानाच मिळणार मोबाइल अॅपद्वारे 9 लाखापर्यंत कर्ज
१. फूड इंडस्ट्री (Food Industry) :
Business Ideas हा एक असा पर्याय ज्याला कधीही मरण नाही. हॉटेल लाख असतील पण तुमच्या पदार्थाला जर चव असले आणि लोकांच्या मनात तो पदार्थ बसला तर तुमच्याकडे गर्दी होणार हे नक्की. शिवाय हा व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी भांडवलात सुरु करू शकता. सुरवातीला जम बसेपर्यंत तुम्ही छोटीशी गाडी, फूड ट्रक, स्टॉल अशा स्वरूपात व्यवसाय सुरु करू शकता. जो अगदी १० हजारांपासूनही सुरु करता येईल. एकदा व्यवसायाची घडी बसली, तुमचे पदार्थ खवय्यांना आवडू लागले की तुम्ही व्यवसायाचा विस्तार करू शकता.
२. ट्रॅव्हल एजन्सी आणि टुरिझम मॅनेजमेंट (Travel and Tourism) :
हल्ली सुट्ट्यांसाठी बाहेर जाण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. अनेक कंपन्या मोठमोठ्या ऑफर देऊन टूर अरेंज करत असतात. पण तुम्हाला जर भटकंतीची आवड असेल, विविध पर्यटन स्थळी तुमचे संपर्क चांगले असतील आणि लोकांना एकत्र करून टूर अरेंज करायची क्षमता असेल तर तुम्ही अगदी सहज ट्रॅव्हल आणि टुरिझमचा व्यवसाय करू शकता. मोठ्या कंपन्यापेक्षा कमी दारात उत्तम सुविधा देऊन तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता. शिवाय घरबसल्या एखादी ट्रॅव्हल एजन्सी सुरु करून आणि तिला अन्य मोठ्या एजन्सीशी जोडून पर्यटकांना जलद सुविधा देण्याचे कामही करू शकता, ज्यामध्ये कमिशन स्वरूपात तुम्हाला बरीच रक्कम मिळते.
३. शिकवणी/ क्लासेस (Coaching Classes) Business Ideas :
शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरूच असते. त्यामुळे आपल्यात प्रत्येकात कुठेतरी एक शिक्षक दडलेला असतो. जर तुमच्या मुलांना शिकवण्याचे, सांभाळून घेण्याचे , त्यांच्यातील हुनर ओळखून त्यांना मार्गदर्शक करण्याचे कसब असेल तर शिकवणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. Business Ideas हा व्यवसाय तुम्ही घरात किंवा एखाद्या खोलीतूनही सुरु करू शकता. त्यामुळे कमी भांडवल आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर निर्भर असा हा उत्तम व्यवसाय आहे. उत्तम जाहिरात करून विद्यार्थी जोडता आले तर पुढे तुम्ही मोठी जागा घेऊन शिकवणीचे स्वरूप मोठे करू शकता.

आता सर्वानाच मिळणार 9 लाखापर्यंत कर्ज
४. इव्हेन्ट मॅनेजमेंट (Event Management) :
Business Ideas आपण सर्वच उत्सवप्रेमी असल्याने प्रत्येक सणा-वाराला, वाढदिवसाला, मित्रांच्या सोहळ्यांना काहीतरी वेगळी तयारी करण्याकडे आपला कल असतो. मग ते अगदी कपडे, सजावट, खानपानाचे बेत सगळ्यातच आपण काहीतरी भन्नाट करायचा प्रयत्न करतो. शिवाय त्यासाठीचे व्यवस्थापन चोक असायला हवे यासाठीही खूप प्लॅनिंग सुरु असते. तुमच्यातली हीच आवड, हीच क्षमता एका व्यवसायात तुम्ही बदलू शकता आणि तो व्यवसाय म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट. तुमचा दांडगा संपर्क, व्यवस्थपणाचे कौशल्य आणि सौंदर्य दृष्टिकोन याची जोड देऊन तुम्ही इव्हेन्ट मॅनेजमेंट करू शकता. या व्यवसायाला सध्या मोठी मागणी आहे. अगदी घरगुती इव्हेंट पासून अनेक राजकीय, सांस्कृतिक, कॉर्पोरेट इव्हेंटही तुम्ही करू शकता. याचीही सुरुवात तुम्हाला कमी भांडवलातून आणि छोटे इव्हेंट करून करता येईल.
५. यु ट्यूब वाहिनी (You Tube Channel) :
गाणी असो, चित्रपट असतो किंवा अगदी कोणताही व्हिडीओ आपल्याला हवा असेल तर सहज आपले हात यु ट्यूब कडे जातो. आज यु ट्यूब हे तुमच्या व्यवसायाचे मुक्त व्यासपीठ म्हणून उभे आहे. या संधीचे तुम्ही सोने करू शकता. लोकांची गरज लक्षात घेऊन तुम्ही असे यु ट्यूब चॅनल काढू शकता जे पाहायला लोकांना आवडेल. Business Ideas मग ते मनोरंजन, फूड, स्पोर्ट्स, टिचिंग, कला, शॉपिंग अगदी कोणताही विषय घेऊन तुम्ही स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु करू शकता. यासाठी आवश्यक असलेले व्हिडीओ शूटिंग आणि एडिटिंग स्किल शिकून तुम्ही घरबसल्या कमी भांडवलात बरेच पैसे कमावू शकता.
4 Responses