Krushisahayak

NLM National Livestock Mission पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ योजना. केंद्र शासनाने सन 2021-22 या  वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे. 

सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

अनुदानाची अधिकतम मर्यादा 

  • शेळी-मेंढी पालनाकरिता रु. 50 लक्ष, 
  • कुक्कुट पालनाकरिता रु. 50 लक्ष, 
  • वराह पालनाकरिता रु. 30 लक्ष 
  • पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रु. 50 लक्ष अशी आहे. 
Krushisahayak

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रकल्पाकरिता स्वहिसा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बॅंकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे.

 NLM योजनेचा लाभ 

  • व्यक्तीगत व्यावसायीक, 
  • स्वयंसहाय्यता बचत गट, 
  • शेतकरी उत्पादक संस्था, 
  • शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, 
  • सहकारी दुध उत्पादक संस्था, 
  • सह जोखिम गट (जेएलजी), 
  • सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.

Mhpashuaarogya Yojana 2023 मृत जनावर नुकसान भरपाई, ऑनलाईन अर्ज सुरू…

सदर योजनांच्या लाभाकरिता ऑनलाईन पदृधतीने अर्ज करावयाचा असून,

अर्ज सादर करताना 

  1. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), 
  2. पॅनकार्ड, 
  3. आधार कार्ड, 
  4. रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र, 
  5. वीज देयकाची प्रत), छायाचित्र, 
  6. अनुभवाचे प्रमाणपत्र,
  7. वार्षिक लेखामेळ,
  8. आयकर रिटर्न, 
  9. प्रशिक्षण प्रमाणपत्र, 
  10. जमिनीचे कागदपत्र, 
  11. बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,   
  12. जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: