शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी ( CM kisan 2023 ) अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये मानधन.
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये सानुग्रह निधी मिळणार आहे.
Table of Contents
या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सानुग्रह निधी मिळणार आहे. कृषी विषयक विपरीत परिस्थितीत असहायतेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये मिळायचे.
2018 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरु केली. तर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नव्याने घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र शासनातील योजनांचे 6 हजार व आता नमो शेतकरी महासन्मान निधीतून आणखी 6 हजार असा हा निधी 12 हजार झाला आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत.
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना सन २०२३-२४ पासुन खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Namo shetkari mahasanman nidhi योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहतील
सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.

योजनेची कार्यपद्धती:-
पी. एम. किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या पोर्टलवरुन / प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली CM kisan 2023:-
पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी CM kisan 2023 योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल / प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.
केंद्र शासनाच्या संमतीने पी. एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.
नमो शेतकरी सन्मान निधी लाभार्थी CM Kisan Beneficiary
सामान्यत: या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे.
CM kisan 2023 नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
Onion Subsidy 2023 अखेर कांदा अनुदान GR आला, हे शेतकरी होणार पात्र
Startup Loan for new business अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज