Krushisahayak

मोबाईलच्या माध्यमातून भरणा होत नाही

PMFBY मित्रांनो आपण जर पाहिलं तर पिक विमा योजनेचा अर्ज भरताना मोबाईलच्या माध्यमातून भरणा अपेक्षित होतं, परंतु तो देखील भरता आला नाही. कॉम्प्युटरच्या माध्यमातून लॅपटॉपच्या माध्यमातून भरत असताना शेतकऱ्याला सेंड फायनान्शिअल आयडी अशा प्रकारचा एरर देत आहे.

याच्या व्यतिरिक्त एक पर्याय आपण जर पाहिलं तर तो म्हणजे सीएससीचा परंतु सीएससीच्या माध्यमातून पिक विमा भरत असताना सुद्धा सीएससीच्या पोटाला पोर्टल कनेक्ट होत नाही. त्याचे फोटो लोड होत नाही. पर्याय सीएससी धारक देखील पिक विमा भरू शकत नाहीत.

लँड रेकॉर्डची साईट कनेक्ट होत नाही PMFBY

या सर्वांमध्येच कमी आहे की काय म्हणून महाराष्ट्र शासनाचा महाभुलेख विभागाचं जे पोर्टल आहे ते पोर्टल सुद्धा डाऊन आहे. त्याच्यामुळे आता सीएससी कनेक्ट झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा लँड वेरिफिकेशन करण्यासाठी लँड रेकॉर्डची जी साईड आहे पोर्टल आहे. ते पोर्टल कनेक्ट होत नाही.

ब्रेकिंग! संकट आल्यास पिक विमा आणि नाही आलं तरीही मिळणार 2 हजार, कृषिमंत्री धनंजय मुंडे

मित्रांनो पर्यायांना पण जर पाहिलं तर शेतकरी स्वतः पिक विमा भरू शकत नाही. शेतकरी सीएससीच्या माध्यमातून पिक विमा भरण्यासाठी गेला तर सीएससी धारकांना सुद्धा पिक विमा भरता येत नाही. आणि पर्यायाने याच्यामध्ये तीन ते चार दिवसाचा कालावधी हा नाहक पणे गेलेला आहे.

बंद साईट बद्दल शासनाची कारवाई नाही

शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक आव्हान करण्यात येत आहे. परंतु या बंद असलेल्या साईट बद्दल किंवा या बंद असलेल्या पोर्टल बद्दल कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पर्यायना पण जर पाहिलं तर या शेवटच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या चार ते पाच दिवसाचे नुकसान झालेले आहे.

PMFBY 31 जुलै शेवटची तारीख असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी हे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्यामुळे या शेवटच्या चार ते पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोड येणार आहे. पर्याय पुन्हा साईट चालणार नाही, पुन्हा शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार नाही. आणि त्यावेळेस सुद्धा पिक विमा भरणारे शेतकरी जास्त असल्यामुळे आणि सीएससी धारकाकडे असेल किंवा जे दुकानदार असतील त्यांच्याकडे लोड असल्यामुळे पर्यायाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून पैशाच्या आकारणी सुद्धा केली जाऊ शकते.

Krushivasant

आजचा हवामान अंदाज ह्या भागात ‘रेड अलर्ट’

मित्रांनो अशा प्रकारे एक रुपयात पिक विमा योजनेचा सुरू असताना सुद्धा किंवा शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारचे परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शासनाने कृषी विभागांना याला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हे इशू सॉल करावे आणि शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ सुद्धा द्यावे हीच एक माफक अपेक्षा.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d