PMFBY Crop Insurance मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून 2023-24 करता एक रुपयात पिक विमा योजना जाहीर केलेली होती. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशा प्रकारची शक्यता होती. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर जून महिन्यामध्ये पाऊस पडला नाही, पर्यायाने पेरण्या झाल्या नाहीत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या एन्डला पाऊस सुरू झाला. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पेरण्या केल्या आणि पेरण्या केल्यानंतर शेतकरी या पिक विमा योजनेसाठी आपला सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येत नाही.
