Post Office Time Deposit Scheme
Post Office Time Deposit Scheme तसेच यामध्ये जॉईंट म्हणजे संयुक्त खाते उघडण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन सज्ञान व्यक्तींना सहभागी होता येते आणि या योजनेअंतर्गत कितीही खाते उघडण्याचे स्वातंत्र्य आहे कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रक्कम यात अडकवता येते. कारण जास्तीच्या रकमेसाठी इथे कोणतीही मर्यादा नाही पैसे किती दिवसांसाठी जमा आहे त्यानुसार व्याजदर लागू होतो म्हणूनच या योजनेला पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंट असे नाव आहे.

पाहा पोस्टाच्या या योजनेची सविस्तर माहिती
एक जुलै 2023 पासून नवे व्याजदर या योजनेअंतर्गत असे आहे.
- Post Office Time Deposit Scheme एक वर्षांचे खाते असेल तर वार्षिक 6.9%,
- दोन व तीन वर्षांचे खाते असेल तर वार्षिक सात 7%,
- पाच वर्षांसाठी खाते उघडले तर मिळणार वार्षिक 7.5% व्याजदर,
- यापैकी एक कालावधी सोयीनुसार निवडता येतो जो कालावधी निवडाल त्यानुसार खात्याची मॅच्युरिटी ठरते.
- नंतर पैसे काढायचे नसतील तर खाते एक्सटेंड करण्याचा म्हणजे वाढवण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
- पण मूळ खाते ज्या कालावधीसाठी उघडले असेल फक्त तितक्याच कालावधीसाठी ते एक्सटेंड करता येते किंवा वाढवता येते.
- जर तीन वर्षांसाठी पहिले मूळ खाते सुरू केले असेल तर तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी ते वाढवता येते.
- मॅच्युरिटीच्या तारखेला जो व्याजदर असेल तो वाढवलेल्या खात्यावर लागू केला जाईल.
- जसे खाते वाढवता येते तसे ते मुदतपूर्वक बंद सुद्धा करता येते पण त्यासाठी काही अटी आहे.

पोस्टाचे नवे व्याजदर लागू झाले
Post Office Time Deposit Scheme अटी व शर्ती
- कोणत्याही कालावधीसाठी सुरू केलेले खाते सुरू केल्याच्या तारखेपासून पहिल्या सहा महिन्यांमध्ये बंद करता येत नाही.
- सहा महिन्यानंतर पण एका वर्षाच्या आत बंद केले तर जमा असलेल्या रकमेवर पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होते.
- म्हणजेच पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेचा लाभ मिळत नाही.
- दोन तीन आणि पाच वर्ष यापैकी कोणतेही खाते एक वर्ष पूर्ण झाल्यावर पण मॅच्युरिटी आधी बंद केले तर जो काही व्याजदर या कालावधीसाठी असेल त्यापेक्षा दोन टक्के कमी व्याजदर प्रत्येक पूर्ण केलेल्या वर्षाकरिता लागू केला जाईल.
- आणि उर्वरित कालावधीसाठी पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होते.
खाते वाढवायचे असेल किंवा बंद करायचे असेल तर?
- Post Office Time Deposit Scheme त्यासाठी संबंधित पोस्टमध्ये विहित नमुन्यातील अर्ज आणि पासबुक जमा करावे लागेल.
- टाईम डिपॉझिट खात्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की पैसे जमा केल्यानंतर खाते सुरक्षा म्हणून तारण ठेवता येते.
- किंवा ते ट्रान्सफर करता येते कोणाकडे ते सर्व ऑथॉरिटीज कडे ट्रान्स्फर करता येते.

ज्येष्ठ नागरिकांना कामाची संधी
Post Office Time Deposit Scheme ऍक्चुअल इंटरेस्ट कॅल्क्युलेशनची वेगवेगळ्या कालावधीसाठी कशाप्रकारे व्याज मिळू शकते?
- कदाचित पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करून एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षांचे खाते उघडले असेल.
- तर एक जुलै 2023 पासून लागू झालेल्या व्याजदरानुसार एका वर्षात १५ लाखांवर एक लाख सहा हजार दोनशे नऊ रुपये व्याज मिळते.
- म्हणजे मॅच्युरिटी अमाऊंट असेल 16 लाख 6 हजार दोनशे नऊ रुपये.
- दोन वर्षांसाठी खाते उघडले तर दोन लाख 15 हजार 578 रुपये एकूण व्याज मिळते.
- ज्यामुळे मॅच्युरिटीचे रक्कम असेल 17 लाख 15 हजार 578 रुपये याच प्रकारे तीन वर्षांचे टाईम डिपॉझिट खाते देणार तीन लाख 23 हजार 367 रुपये व्याज.
- आणि तीन वर्षानंतर एकूण मिळणार 18 लाख 23 हजार 367 रुपये.
- जर हे 15 लाखांची गुंतवणूक तुम्ही 5 वर्षांसाठी केली तर पाच वर्षात एकूण 5 लाख 78 हजार 520 रुपये व्याज मिळतो.
- आणि मॅच्युरिटी ची रक्कम असेल 20 लाख 78 हजार 520 रुपये.
- तर किती रक्कम जमा करायची त्यावर किती व्याज मिळू शकते याची कॅल्क्युलेशन पोस्ट इन्फो या अधिकृत मोबाईल ॲप वर करून बघता येईल.
- मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल स्टोअरवर उपलब्ध आहे.
Kisan Credit Card Subsidy :किसान क्रेडिट कार्ड सब्सिडी कब मिलती है?
Namo Shetkri Sanman Nidhi 2023 :नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
One Response