Sukanya Samriddhi Yojana
Table of Contents
ठेवींचे नियम Sukanya Samriddhi Yojana
- हे खात किमान अडीचशे रुपये भरून चालू करता येते.
- तसेच या योजनेत दरवर्षी किमान अडीचशे रुपये भरावेच लागतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरतात.
- तसेच यात एका आर्थिक वर्षात एक रकमे किंवा अनेक हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय उपलब्ध आहे.
- या योजनेत खात उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत पैसे भरावेच लागतात.
- एखाद्या वर्षी किमान रक्कम अडीचशे रुपये भरली नाही तर ते खाते अकार्यक्षम किंवा बंद खात मानले जाते.
- अशा प्रकारचं खातं 15 वर्ष पूर्ण होण्याआधी पुन्हा चालू करता येते.
- त्यासाठी जेवढी वर्ष खाता बंद असेल तेवढ्या वर्षांसाठी किमान रक्कम रुपये 250 अधिक दंडाचे रक्कम प्रतिवर्षी 50 रुपये भरावे लागतील.
- थोडक्यात जेवढी वर्ष खात बंद असेल तेवढे वर्षांसाठी प्रति वर्ष तीनशे रुपये भरावे लागतील.
- या योजनेत भरलेले रक्कम आयकर कलम 80c अंतर्गत करमुक्त आहे.

आता मागेल त्याला काम नव्हे तर हवे ते काम मिळणार
व्याज
- Sukanya Samriddhi Yojana 2 या योजनेचा चालू व्याजदर 8% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे.
- या योजनेत योग्य व्याज मिळवण्यासाठी दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे भरणे आवश्यक आहे.
- या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाते.
- तसेच योजनेत मिळालेला व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.
Sukanya Samriddhi Yojana 2 खात्यातील पैसे काढण्याविषयी
- मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते.
- ही रक्कम ज्या वर्षी मुलगी 18 वर्षांची होईल किंवा दहावी उत्तीर्ण होईल त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत काढली जाऊ शकते.
- पैसे एक रकमे किंवा हप्त्यांमध्ये सुद्धा काढता येतात मात्र वर्षातून एकदा असे पाच वर्ष काढता येतात त्यापेक्षा जास्त काढता येत नाहीत.

पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास फक्त 1100 रुपयात
मुदतपूर्वक खात बंद करणे
- Sukanya Samriddhi Yojana 2 खात उघडल्यानंतर पाच वर्षांनी खाली लाटींवर मुदतपूर्वक हात बंद केलं जाऊ शकतो.
- खातेदाराचा काही कारणांनी मृत्यू झाला तर खाते बंद करता येते.
- मात्र याबाबतीत खातेदाराच्या मृत्यूच्या तारखेपासून पैसे परत मिळण्याच्या तारखेपर्यंत बचत खात्याचा व्याजदर लागू होतो.
- खातेदारकाला एखादा असाद्य रोग झाल्यामुळे पैशाची गरज पडल्यास किंवा खात चालवणाऱ्या पालकाचाच मृत्यू झाला ज्यामुळे पैसे भरणे अशक्य आहे अशा परिस्थितीत सुद्धा खातो बंद करता येतो.
- खात मुदतीपूर्वी बंद करण्यास आवश्यक कागदपत्र पासबुक आणि अर्जासह सादर करावे लागतील.
Beti bachao beti padhao yojana बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना: ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म, पात्रता
मुदतपूर्ती नंतर
- Sukanya Samriddhi Yojana 2 खात सुरू केल्यापासून 21 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल त्यानंतर खात बंद करता येईल.
- तसेच खातेदार मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न ठरले तर त्या खर्चासाठी खात बंद करता येईल आणि सर्व रक्कम काढून घेता येईल.

Sukanya Samriddhi Yojana 2 कागदपत्र
- खात उघडण्याचा फॉर्म
- मुलीचा जन्म दाखला
- पालकांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी
- पालकांचा पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, विज बिल किंवा पासपोर्ट
Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग
One Response