Krushisahayak

Kanda Chal Anudan 2023 थोडक्यात महत्त्वाचे… २५ टन क्षमतेची एक कांदा चाळ उभारणीस दोन ते तीन लाख रुपये खर्च. कृषी विभागाकडून ५० टक्के (२५ टनांसाठी ८७ हजार ५०० रुपये) अनुदान राज्यात आतापर्यंत तब्बल ९३ हजार ७१९ कांदा चाळी तयार कांदा साठवणूक क्षमता पोचली २१ लाख ९९ हजार टनांवर दरवर्षी कांद्याची सुमारे चार ते पाच एकरावर लागवड करता. उत्पादित कांद्याला कमी दर मिळत असल्यास त्याची साठवणूक करतो. त्यासाठी कृषी विभागाच्या अनुदानातून ५० टन कांद्याची चाळ आठ वर्षांपूर्वी उभारली होती. त्याचा फायदा आजही होत आहे.

वर्षात दहा हजारांवर कांदाचाळींची उभारणी

 • शेतकरी कांद्याची दरवर्षी जून-जुलैमध्ये लेट खरीप कांद्याची सप्टेंबर-ऑक्टोबर, तर उन्हाळी कांद्याची जानेवारी-फेब्रुवारीत लागवड करतात.
 • काही शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत कांद्याची लागवड करतात.
 • एकाच वेळेस हा कांदा बाजारात आला तर शेतकऱ्यांना कमी दर मिळतो त्यामुळे मोठे नुकसान होते.
 • ते होऊ नये म्हणून त्याची साठवणूक करून त्यानंतर हळूहळू कांदा विक्रीस आणणे आवश्यक असते. त्यासाठी कांदा चाळी महत्त्वाच्या ठरतात.
Kanda Chal Anudan

मॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल

 • Kanda Chal Anudan 2023 २५ टन क्षमतेची एक कांदा चाळ उभारणीस जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो.
 • परंतु कृषी विभागाकडून ५० टक्के (२५ टनांसाठी ८७ हजार ५०० रुपये) अनुदान दिले जाते.
 • कृषी विभागाने जवळपास दहा हजार ५५३ कांदा चाळीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानातून कांदा चाळीसाठी अनुदान दिले आहे.
 • त्यामुळे राज्यात आतापर्यंत तब्बल ९३ हजार ७१९ कांदा चाळी उभारल्या गेल्या आहे त्याची कांदा साठवणूक क्षमता २१ लाख ९९ हजार टन झाली आहे.
 • याशिवाय शेतकरी कंपन्यांनाही राज्य शासनामार्फत थेट एक हजार टन कांदा साठवणुकीसाठी अनुदान दिले आहे.
 • त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मात्र मागील दोन महिन्यांत वादळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.
 • त्यामुळे पावसाने भिजलेला कांदा साठवणूक करणे अशक्य असले तरी न भिजलेल्या कांद्याची साठवणूक केली आहे.
 • त्यादृष्टिने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळी उभ्या केल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
Krushisahayak

9000 रु. महिना कमवा?

Kanda Chal Anudan 2023 यंदा साडेपाच लाख हेक्टरवर लागवड

 • Kanda Chal Anudan राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी कांद्याचे सरासरी सात लाख २२ हजार ९१९ हेक्टरच्या दरम्यान क्षेत्र आहे.
 • त्यापैकी खरीप आणि लेट खरीप कांद्याची एक ते दोन लाखांच्या दरम्यान लागवड दरवर्षी होते.
 • रब्बी हंगामाचे सरासरी पाच लाखांच्या दरम्यान क्षेत्र आहे. त्यापैकी चालू वर्षी जवळपास साडे पाच लाख हेक्टरवर लागवडीची स्थिती होती.
 • उत्पादित कांद्याच्या साठवणुकीसाठी शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देत आहेत.

Land Record Law 2023 :बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

Work Form Home Jobs In Marathi :घर बसल्या काम करा आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d