Land Transfer महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी हुकूमनाम्याप्रमाणे न्यायालयाच्या किंवा शेतजमिनीच्या सहधारकांनी अर्ज केल्यास जमिनीचे विभाजन करण्याची पद्धती अधिनियम १९४७ मधील तरतुदीत विषद करण्यात आली आहे.
Table of Contents
या तरतुदींना अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे विभाजन केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरवर करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरूपात हे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे. दरम्यान, शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

Land Transfer अर्जासोबत काय हवे…
शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्जदाराने आपले नाव, सहधारकांचे नाव व पत्ता, अर्जदाराशी नाते, शेत जमिनीचा वर्ग, जिरायत / बागायत जमिनीचा तपशील, एकूण गटाचे क्षेत्र, अर्जदार व सहधारकांचे त्यातील क्षेत्र, १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर आपसात वाटणी केलेले क्षेत्र, त्याच्या चतुःसीमा व इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकांची स्वाक्षरीसह संमती, आदी बाबींची पूर्तता केल्यास विभाजनाचे काम तातडीने करून देण्यात येणार आहे.
One Response