Farmers Corner कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज लाखो टन कापूस शेतकऱ्यांच्या घरात भावाच्या प्रतीक्षेत पडुन आहे, ऐन कांदा काढणीच्या वेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे हजारो हेक्टर कांदा बांधावर सडक पडलेला आहे,
जो कांदा हाती लागलेला आहे तो वाहतूक खर्चालाही महाग पडत आहे, कोरोनाच्या संकटातून कसाबसा सावरून शेतकरी परिस्थितीशी झगडत उभा राहिला, Farmers Corner त्यानंतर निसर्गाची साथ न भेटल्यामुळे तो पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत आहे. ज्या सरकारकडे मायबाप या अपेक्षेने पाहत होता त्या सरकारने सुद्धा घात केला.
काही दिवसांपूर्वीच या सरकारने एक योजना आणली आहे शासन आपल्या दारी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरील आणि तरीही हे निर्दयी सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी तोंडात घास आणि मानात बुक्की अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे,दिग्गज मीडिया मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे,
नको त्या प्रश्नांना हवा देत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा बळीराजाच्या पिळवणूकीच्या प्रश्नाकडे मात्र कुठल्याही नेत्याचे अथवा स्टार मीडियाचे लक्ष जाताना दिसून येत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. Farmers Corner शेतकऱ्यांची अवस्था भिकाऱ्यासारखी केली असून सरकार तुटपुंजी मदत निवडक शेतकऱ्यांना देऊ या बळीराजाला लाचार करून टाकण्याचे काम करीत आहे.
शेतकऱ्याच्या पिकाला जर उत्पन्न आणि खर्च या तोडीत योग्य हमीभाव दिला तर तुमच्या मदतीची गरज काय?शेतकरी संघटना सुद्धा जाणीवपूर्वक या गोष्टीकडे पाठ फिरवतानाचचे चित्र दिसून येत आहे. कपाशीच्या विशिष्ट वानांची सध्या जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करण्यात आलेली आहे. बियाणे टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे .
One Response