AHD Recruitment :ऑनलाईन पध्दतीने अर्ज/वयोमर्यादा/परिक्षा शुल्क/निवडप्रक्रिया

AHD Recruitment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AHD Recruitment स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये राज्यांमध्ये अनेक मोठ्या भरत्या काढल्या जात आहेत. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळ सेवा कोठ्यातील रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे. ज्यासाठी 27 मे 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

पदे

 • पशुसंवर्धन पर्यवेक्षक 376 जागा
 • वरिष्ठ लिपिक 44 जागा लघुलेखक उच्च श्रेणीचे 2 जागा
 • लघुलेखक निम्न श्रेणीच्या 13 जागा
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 जागा
 • तारतंत्रीत 3 जागा
 • यांत्रिकीच्या 3 जागा
 • बाष्पक परिचयकसाठी 2 जागा
 • एकूण 446 जागांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज तारीख

 • AHD Recruitment दि. २७.०५.२०२३ सकाळी १०.०० वाजल्यापासून ऑनलाईन परिक्षेचा दिनांक ११.०६.२०२३ रात्री ११.५९ पर्यन्त www.ahd.maharashtra.gov.in पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.
AHD Recruitment

ऑनलाइन अर्ज करा.

AHD Recruitment वयोमर्यादा

 • अ. जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ०१.०५.२०२३ या तारखेस गणण्यात येईल.
 • आ. जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी वयोमर्यादा किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • इ. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम:
  • १. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
  • २. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षांपर्यंत.
  • ३. पात्र खेळाडूंच्या बाबतीत ४३ वर्षांपर्यंत.
  • ४. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे विकलांग माजी सैनिकांबाबतीत कमाल ४५ वर्षापर्यंत.
  • ५. अनाथ उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षांपर्यंत.
  • ६. अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत ५५ वर्षांपर्यंत. (शासन (शासन निर्णय २०२३/प्र.क्र.१४/कार्या/ १२ / दिनांक ३.३.२०२३ नुसार २ वर्षे शिथील). क्र सनिव
  • ७. विहीत वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.
Maharashtra Land Right Proofs

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्हता / पात्रता गणण्याचा दिनांक-

 • AHD Recruitment सर्व पदांकरिता दिनांक ०१.०५.२०२३ रोजी विहित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असणे अनिवार्य आहे.
निवडप्रक्रिया:-
 • १. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
 • २. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल :-
 • i. पदुम विभाग, पशुधन पर्यवेक्षक (सेवा प्रवेश) नियम २०१३, दिनांक :-१०/०९/२०१३
 • ii. पदुम विभाग, वरिष्ठ लिपीक (सेवा प्रवेश) नियम, १९८२ दिनांक- ०७/०८/१९९०
 • iii. पदुम विभाग, लघुलेखक (उच्च श्रेणी / निम्न श्रेणी) (सेवा प्रवेश) नियम, १९९७ दिनांक २४/०६/१९९७
 • iv. पदूम विभाग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहायक/ वरिष्ठ बाष्पक परिचर / बाष्पक परिचर / प्रशितन यांत्रिकी / वीजतंत्री नि मिस्त्री / तारतंत्री/यांत्रिकी/सुतार (सेवा प्रवेश) नियम, १९८४ दिनांक- १४/०६/१९८४ तथा बाष्पक परिचर नियम २०११.
Maharashtra Land Right Proofs

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

AHD Recruitment निवडीची पद्धत :-
 • १. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
 • २. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
 • ३. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
 • ४. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकुण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील,
 • ५. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ३० गुण ठेवुन एकुण १२० गुणांची असेल. तसेच शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी ८० गुणांची राहील, त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.
परिक्षा शुल्क:-
 • १. अमागास १०००/- –
 • २. मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग/ माजीसैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
 • ३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.
अर्ज करण्याची पध्दत:-
 • AHD Recruitment १. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येईल.
 • २. पात्र उमेदवाराला देव आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/calmay23/ या संकेतस्थळाद्वारे दिनांक २७.०५.२०२३ ते ११.०६.२०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
 • ३. विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना:
 • AHD Recruitment उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज https://hpsonline.ibps.in/calmay23/ या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक २७.०५.२०२३ ते दिनांक ११.०६.२०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based ) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक २७.०५.२०२३ ते दिनांक ११.०६.२०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

Child Aadhar Card 2023 :घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड

Aadhar Update 2023 : आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *