Tokan Yantra Scheme शेतकऱ्यांना जिल्हा परिषद लातूर सेस फंडाअंतर्गत सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी तत्वावर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणा नवा ट्रॅक्टर! सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ.
Table of Contents
या योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी 20 आक्टोबर 2022 पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे वर दिलेल्या कागदपत्रासह अर्ज करण्याचे अवाहन कृषि विकास अधिकारी व मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. तसेच शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. Tokan Yantra Scheme

आवश्यक कागदपत्रे
- 7 /12, 8-अ
- आधार कार्ड
- बँक पासबुकाच्या झेरॉक्स
- अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र
- अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tokan Yantra Scheme असा करा अर्ज
- सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी वरील नमून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून घ्याव्यात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद / पंचायत समिती या ठिकाणी संबंधित कागदपत्रे व अर्जाचा नमुना दाखल करावा.
- अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यास पुढील एक महिन्यात लाभार्थ्यांनी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीने सोयाबीन टोकन यंत्र खरेदी करून त्याबद्दलची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
Free Flour Mill Scheme 2023 :मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र
One Response