Headlines

Nuksan Bharpai नुकसानग्रस्तांना 7 दिवसांत मदत

Nuksan Bharpai
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai वनकुटे परिसरात पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरुपात आजच उभारणी करा. नुकसान झालेल्या २२ कुटुंबांना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे व अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी हिरामणबर्डे, कचरू वाघ यांच्या घरांची पाहणी केली. त्यानंतर बबनराव काळे, भागापायघुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळेयांच्या पिकांची पाहणी केली.

पाच दिवस १० मिमी. पाऊसही नैसर्गिक आपत्ती

मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस हीनैसर्गिक आपत्ती म्हणून गृहित धरण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा पिकांचीसातबारावर नोंद नसली तरी पंचनाम्यात नोंद घेऊन भरपाई देण्यात येईल.

Krushisahayak

येथे क्लिक करा.

थेट शेतात आलो, शिंदेंचा ठाकरेंना टोला

धाराशिव मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसानपाहणीसाठी थेट शेतात आलो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी मोर्डा व वाडीबामणी या गावांना भेटदेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८०टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्त्व होते; परंतु माजीमुख्यमंत्री ठाकरे यांना तत्त्वाचा ही विसर पडला आहे. ते आता १०० टक्केराजकारण करीत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

Krushisahayak

नुकसान भरपाई यादी पहा

द्राक्षबागा भुईसपाट Nuksan Bharpai

मुख्यमंत्र्यांनी सीताबाई सुरवसे आणिउत्तम सुरवसे (रा. मोर्डा, ता. तुळजापूर) यादाम्पत्याच्या भुईसपाट झालेल्या दोनएकर द्राक्ष बागेची पाहणी करून त्यांनाधीर दिला.यावेळी धाराशिवचे पालकमंत्री तानाजीसावंत, तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते.धाराशिव जिल्ह्यात २५०० हेक्टरक्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

हेक्टरी ५० हजार द्या :अजित पवार यांचे पत्र

मुंबई : नुकसान झालेल्या पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयेव फळबागांसाठी हेक्टरी एक लाखरुपयांची मदत तातडीने जाहीरकरावी, अशी मागणी करणारे पत्रविरोधी पक्षनेते अजित पवार यांनीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनालिहिले आहे. निर्यातक्षम द्राक्षबागायतदार, बेदाणा प्रक्रियाउद्योगांना भरीव मदत करावी अशीमागणीही त्यांनी केली आहे.

Vruksh Lagvad Anudan Yojana :वृक्ष लागवड अनुदान योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!