Tur Price Update सरकारने आयातदारांना ३० दिवसांपेक्षा अधिकचा स्टॉक बाजारात आणण्याचे आदेश दिले आहेत. पण याचा बाजारावर विशेष परिणाम होणार नाही, असे आयातदार सांगत आहेत. सध्या तुरीला ८ हजार ५०० ते ९ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तूर १० हजारांचा ही टप्पा गाठू शकते, असा अंदाज तूर बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सरकारच्या दबावानंतर ही तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. सरकारच्या दबावाला झुगारून तूर अनेक बाजारांमध्ये १० हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचली. तुरीच्या दरातील तेजी कमी होत नसल्याने सरकारची मात्र चांगलीच कोंडी झाली.
Table of Contents
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार डाळींचे भाव दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तुरीच्या डाळीचे भाव अनेक बाजारांमध्ये १३० ते १४० रुपयांच्या दरम्यान आहेत. तूरडाळ १३० रुपयांच्या आतच ठेवण्याचा सरकारचे उदिष्ट होते. पण तूर डाळयापेक्षा महाग झाल्याने सरकारचीही कोंडी होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
Fertilizer Prices In Maharashtra :आता मोबाइलमध्ये पाहा तुमच्या जवळील खताच्या दुकानातले भाव काय आहे
सरकारने तुरीचे भाव करण्यासाठी व्यापारी, स्टॉकिस्ट प्रक्रियादार आणि आयात दरांकडून स्टॉकची माहिती मागितली. याचा बाजारावर काही परिणाम झाला नाही. कारण देशात स्टॉकच कमी आहे. त्यामुळे सरकारने आयातदारांवर दबाव वाढवत ३० दिवसांपेक्षा अधिकचा स्टॉक बाजारात विकण्याचे आदेश दिले आहेत. Tur Price Update पण आयातदारांकडे स्टॉक कमीच आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा बाजारावर काही परिणाम होणार नाही, असेही आयातदारांनी सांगितले.
तमिळनाडूत तूर डाळ खरेदीसाठी टेंडर
तमिळनाडू सरकारने तूर डाळ खरेदीसाठी टेंडर काढले. यामुळे तुरीच्या दरात आणखी सुधारणा झाली. आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीच्या दरात तमिळनाडू सरकारच्या यानिर्णयामुळे सर्वाधिक वाढ झाली. सध्या म्यानमार आणि देशात तुरीचा स्टॉक खूपच कमी आहे. देशातील नवी तूर येण्यास किमान ७ महिन्यांचा कालावधी लागेल. तर आफ्रिकेतील तूर आयात होण्यास ऑक्टोबर उजाडू शकतो. तोपर्यंत सरकारला तूरडाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत Tur Price Update
सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ८०० रुपयांचा सरसरी भाव मिळत आहे. दरात पुढील काळात आणखी सुधारणा होऊ शकते. कारण देशातील मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. तर किमान ५ ते ७ महिने तुरीचा पुरवठा वाढणार नाही. परिणामी तुरीचे दर १० हजारांचा ही टप्पा गाठू शकतात. पण पुढील काळात तुरीचे दर मॉन्सून आणि सरकारच्या धोरणावर ही बऱ्यापैकी अवलंबून असतील, असे जाणकारांनी सांगितले.
Flour Mill Scheme : महिलांसाठी सरकार घेऊन आलाय 500 रू. गिरणी, ऑनलाईन अर्ज सुरू
One Response