Protsahan Anudan फेब्रुवारीत 1 हजार कोटी वितरित

Protsahan Anudan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Protsahan Anudan राज्य सरकारने ४७०० कोटी रुपयांची पुरवणी मागणीत तरतूद केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २३५० कोटी त्यानंतर अनुक्रमे ६५०, ७०० आणि फेब्रुवारी महिन्यात एक हजार कोटी रुपये वितरित केली होती. अजूनही पात्र शेतकऱ्यांना ७५० कोटी रुपयेवितरित करणे बाकी आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते. मात्र कोरोना महामारीमुळे प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती.

Kanda chal anudan 2023 :कांदा चाळ अनुदान वाढले

दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित Protsahan Anudan

दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा केली होती. त्यानंतर तीन टप्प्यांत ही रक्कम वाटप करण्यात आली होती. मात्र अजूनही राज्यातील दोन लाख शेतकरी Protsahan Anudan अनुदानापासून वंचित आहेत. राज्यातील १२ लाख ७९ हजार ९०४ शेतकरी खाती पात्र ठरविण्यात आली होती.

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

Onion Subsidy Maharashtra ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशीच अवस्था कांदा अनुदान योजनेची

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!