Onion Subsidy अमरावतीत एकच शेतकरी ठरला कांदा अनुदानासाठी पात्र

Onion Subsidy
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Subsidy बाजारात कांद्याचे दर गडगडल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. कांदा उत्पादकांनी या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार तीव्र केली.

कांदा उत्पादकांचा भाग असलेल्याना शिकपट्ट्यात याचे पडसाद सर्वाधिक उमटले. त्याची दखल घेत राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा म्हणून २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु या योजनेच्या लाभासाठी असलेल्या अटी नियमांमुळे शेतकऱ्यांवर योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

वीसपैकी एकच अर्ज अनुदानासाठी पात्र

शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा जणू लाभच मिळू नये याकरिता हे निकष लावण्यात आले की काय, असेही आरोप आता होत आहेत. अमरावती जिल्ह्यात योजनेच्या लाभासाठी २० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. छाननी अंती केवळ बेलोरा येथील सिंधूताई कृष्णराव साखरकर यांच्याच सातबारावर खरीप कांदा अशी नोंद आढळली. परिणामी, वीसपैकी त्यांचाच एकमेव अर्ज अनुदानासाठी पात्र ठरला आहे. त्यांनी ८५.२२क्विंटल कांदा बाजार समितीत विक्री केला. त्या आधारे सिंधूताई साखरकर या २९ हजार ८२७ रुपयांचे अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांचा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे. शासनाने लादलेल्या निकषांमुळे तब्बल १९ शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

..असे आहेत निकष Onion Subsidy

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत शेतकऱ्याने कांदा विकलेला असावा.ऑनलाइन सातबारावर त्याची नोंद असावी. त्यावर पटवाऱ्याची सही आणि शिक्का हवा. खरीप हंगामातील लागवड असली पाहिजे. लेट खरीप कांदा अशा प्रकारच्या सातबारावरील नोंदीची देखील सक्ती करण्यात आली आहे. बहुतांश शेतकरी खरीप किंवा रब्बी अशी नोंद घेतात. अनेक ठिकाणी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीची सोय नाही. परिणामी, भाजी बाजारात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. अशा शेतकऱ्यांना देखील अनुदान योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

Weather Update 2023-24 आता ‘ओला दुष्काळी’ म्हणून मराठवाड्याची ओळख होणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख

Shettale Astarikaran Anudan शेततळे अस्तरीकरणासाठी 117 कोटी रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!