Halad Price वसमतच्या मोंढ्यात हळद गेली 9 हजारांवर

Halad Price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Halad Price कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात मंगळवारी झालेल्या बोली बिटामध्ये वर्षभरातील सर्वाधिक ९ हजार ९० रुपयांचा दर हळदीला मिळाला.

कमीत कमी ६४४५ पर्यंत हळदीची बोली झाली. अजून हळदीचे दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

प्रथमच हळदीस ९ हजारांवर दर

वसमत येथील मोंढ्यात गतवर्षभरापासून हळदीचे दर घसरत असलेले पाहावयास मिळाले. ९ मे रोजी मोंढ्यात ११ हजार हळदीच्या कट्ट्यांची विक्रमी आवक झाली. यावेळी हळदीचे बोली बिट पुकारण्यात आले. प्रारंभी शेतकरी गंगाधर जाधव (रा. म्हातारगाव) यांच्या हळदीची बोली झाली. वर्षभरात प्रथमच हळदीस ९ हजारांवर दर मिळाला.

Krushisahayak

हळदीचे दर पहा.

भविष्यात हळदीचे दर वाढतील Halad Price

भविष्यात हळदीचे दर वाढतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. बोली बिटात हळद कमीत कमी ६४४५ प्रती क्विंटल ते जास्तीत जास्त ९ हजार ९० रुपये गेली आहे. मोंढ्यात हळदी पाठोपाठ सूर्यफूल, सोयाबीन, हरभरा, भुईमूग, गहू आदींची आवक सुरूच आहे.

Krushisahayak

हळदीचे दर 10 हजार पार जाणार

सभापती तानाजी बेंडे, उपसभापती सचिन भोसले यांनी मोंढ्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लिलाव कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. मंगळवारी झालेल्या बिटात शेतकरी जाधव यांच्या १०५ कट्ट्याच्या हळदीस ९ हजार ९० रुपये दर मिळाला. भविष्यात हळदीचे दर वाढतील, असे व्यापारी शेख रियाजयांनी सांगितले.

Avkali Nuksan Bharpai अवकाळी पावसाचा फटका; 26 कोटींची नव्याने मागणी

Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!