Kharif Review Meeting 2023-24 शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरिपाचे नियोजन करा, शेतकऱ्यांचा बळी नको

Kharif Review Meeting
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharif Review Meeting अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.

शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याचे योग्य नियोजन करा. अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.

Krushisahayak

युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

खरीप आढावा व नियोजन बैठक

कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार काळे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली. अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आशा खरीप हंगामाकडे लागल्या आहेत .त्यामुळे या खरीप हंगामात बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची कृषी विभागाने काळजी घ्यावी.

Krushisahayak

मुख्यमंत्री सोलर योजना 2.0 शेतीला दिवसा वीज

बियाणे व खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्राथमिक तपासणी Kharif Review Meeting

बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बियाणे व खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्राथमिक तपासणी पूर्ण करून घेऊन वारंवार तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना आ. काळे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Krushisahayak

एक पीक देते 2 लांखाचे उत्पादन तर दुसरे देते रोजचे 2 हजार रुपये

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी मनोसोनवणे, संगमनेरचे कृषी अधिकारीगोविंद कुलाळ, नायब तहसीलदारमनीषा कुलकर्णी, श्रीमती शोभा गोरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारीसाखर कारखान्याचे संचालक सचिनचांदगुडे, राहुल रोहमारे, अनिल कदम,शिवाजीराव घुले, शंकरराव चव्हाण सर्वमंडल कृषी अधिकारी, तलाठी,मंडलाधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषीसहायक, शेतकरी मित्र, आत्माकमिटीचे सदस्य, तालुका शेतकरीसमन्वयक, कृषी विमा कंपनी प्रतिनिधीव शेतकरी उपस्थित होते.

Onion Market Update 2023:कांदा उत्पादक संकटात, राज्यमंत्री भारती पवारांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार

Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!