CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट

CIBIL Score
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBIL Score एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करताना उद्योजकाला भांडवल उभारणी या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते.

बँका आणि आर्थिकसंस्था, व्यवसाय जीवन चक्राच्या विविध टप्प्यांवर आर्थिक मदत देतात; परंतु अशी कर्ज देताना ते काही मुद्दे लक्षात घेतात.

तुमचा सिबिल स्कोअर पहा.

सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनवून व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा. प्रमुख उत्पादने आणि सेवांचा सारांश, व्यावसायिकाचा व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव, उत्पादनासाठी लक्ष्य बाजारपेठ, उत्पादनाची माहिती आणि उत्पादनाची निवड करण्याची कारणे, मार्केटिंगच्या योजना, कर्जाचा हेतू आर्थिक स्टेटमेंट, अंदाजित महसूल मॉडेल, करा नंतरचा नफा आदी मुद्दे मांडून उत्तम प्रोजेक्ट रिपोर्टची आखणी केली पाहिजे.

CIBIL Score

सिबिल स्कोअर किती असावा.

भांडवल उभारणीमध्ये योगदान

बँका कर्ज देताना व्यावसायिक भांडवल उभारणीच्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिकाने आजवर केलेले भांडवल योगदान जरूर लक्षात घेतात, त्यालाच ओन कॉन्ट्रिब्युशन असे म्हणतात. जर मालक स्वतःच्या व्यवसायात स्वतःच गुंतवणूक करीत नसेल तर बँकांनी तरी गुंतवणूक का करावी, हा प्रश्न व्यावसायिकाला कर्जासाठी अर्ज करताना विचारला जाऊ शकतो. जेव्हा व्यावसायिकाचे अधिक वैयक्तिक भांडवल लागलेले असते, तेव्हा तो व्यवसाय जतन करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक काटेकोर असतो हे धोरण पाहण्यात येते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजना, 20 लाखांपर्यंत कर्ज

उत्तम सिबिल स्कोअर (CIBIL Score)

बँका तसेच वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहून मगच कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितात. सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो. सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितकी कर्जमंजुरीची शक्यताही अधिक असते. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० गुणांदरम्यान असतो आणि ७५० पेक्षा अधिक हे सामान्यतः चांगला स्कोअर म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोअर CIBIL Score जर ७५० हून अधिक असल्यास, अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदरांसह कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाते.

कर्ज परतफेड करण्याची क्षमता

कर्ज परतफेड करण्याची क्षमता तपासली जाते. अर्ज करताना सर्वप्रथम बँकांना, तो कंपनीच्या रोख मिळकती मधूनच म्हणजेच व्यावसायिक उत्पनामधूनच कर्जाची परतफेड कशाप्रकारे सक्षमपणे करू शकतो, हे प्रस्थापित केले पाहिजे.

आता जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये

बँक कर्ज देताना हे जरूर लक्षात घेते की भविष्यात जर व्यावसायिकाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तर कर्जाच्या परतफेडीला कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि हे प्रस्थापित करण्याकरिता योग्य आर्थिक अंदाजानुसार चांगले व्यावसायिक बजेट ज्यामध्ये आकस्मिक निधी यांचा समावेश केलेला असेल तर बँकेला कर्ज देताना कर्जदाराबद्दल अधिक विश्वास वाटू शकतो.

Government Loan Scheme 2023 :ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

Maharashtra Education : ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *